चिपळूण:- सावर्डे-खोतवाडी येथे गांजा प्रकरणी अटकेत असलेल्या मिनाक्षी जयस्वाल दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी ही पोलीस कोठडी संपताच पुन्हा न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिनाक्षी जयस्वाल हिच्या घरातून सावर्डे पोलिसांनी १ लाख १८ हजार १६० रुपये किंमतीचा तब्बल ५ किलो ९०८ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणी तिला अटक केल्यानंतर आणखी २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. असे असताना बुधवारी ही कोठडी संपताच तिला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.