गांजा तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

रत्नागिरी:- रत्नागिरी गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे तब्बल 1 लाख 42 हजार रुपये किमतीचा आठ किलो वजनाचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला असून या कारवाईत तिघांना जेरबंद केले आहे विशेष म्हणजे त्यातील एकाच्या कोल्हापूर येथून मुसक्या आवळल्या आहेत पहाटे साडे तीनच्या सुमारास या कारवाईला रत्नागिरीतून सुरुवात झाली.

गांजाची तस्करी करणाऱ्या रॅकेट पुन्हा रत्नागिरी सक्रिय झाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी गांजा तस्कर यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मोहीम हाती घेतली रत्नागिरीत किरकोळ गांजा विक्री करणाऱ्यासह गांजा सप्लाय करणाऱ्या मोर त्यालाच उचलण्याचा प्लॅन पोलिसांनी केला होता त्यानुसार रत्नागिरीतील भाडे परिसरात राहणारा रुहान नामक तरुणाला गांजाची विक्री करताना शहर पोलिसांनी रंगेहात पकडले होते आणि त्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला.

रोहन याच्या मुसक्या वळल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून गांजा हस्तगत केला आणखीन गांजा सप्लाय होणार असल्याची माहिती तपासात उघड झाली आणि त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली कोल्हापूर कनेक्शन असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली. रुहान याला अटक केल्यानंतर शहर पोलिसांनी गांजा सप्लाय ज्या वाहनातून होत आहे त्याची माहिती काढली आणि पोलिसांनी नाका-बंदी सुरू केली.

मोठ्या प्रमाणात गांजा सप्लाय होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शहरात अनेक भागात नाकाबंदी लावली रात्रभर पोलिसांचा वॉच वाहनांवर होता ज्या वाहनातून या गांजाची तस्करी होणार होती त्या वाहनावर पोलिसांची बारीक नजर होती. गांजाची तस्करी करत असताना संशयितांनी चलाखीने ही तस्करी पकडले जाऊ नये यासाठी चक्क एसटी बसचा वापर करण्यात आला त्यातील एक जण प्रवासी म्हणून बसमधे चढला आणि थेट बागेतून गांजा घेऊन रत्नागिरीच्या दिशेने निघाला.

कोल्हापूर रत्नागिरी या एसटी बस मधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रेल्वे स्टेशन फाट्यानजीक नाकाबंदी सुरू केली होती आणि पहाटेच्या सुमारास  बस त्या ठिकाणी आली पोलिसांच्या कारवाईला पुन्हा सुरुवात झाली. ही बस रेल्वे स्टेशन फाट्यानजीक थांबल्यानंतर पोलिसांनी बस कि झडती घेतली त्यावेळी बस मध्ये असम चंद्रकांत जीत गये (राहणार संगमनगर हातकणंगले) या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. ८ किलो गांजा हस्तगतअसम याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे आठ किलो 941 ग्रॅम गांजा मिळून आला या गांजाची किंमत अंदाजे एक लाख 42 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ज्याला गांजा सप्लाय होणार होता त्याला यापूर्वी पोलिसांनी जेरबंद केलं होतं पहाटेच्या सुमारास एका सप्लायर ला पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र या टोळीचा म्होरक्या कोण असा प्रश्न असतानाच पोलिसांना या मोरक्या ची देखील माहिती मिळाली आणि पुन्हा म्होरक्या शोधासाठी शहर पोलिसांचे एक पथक कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. ज्याने हा गांजा पाठवला होता तो कोल्हापूर येथील हातकणंगले येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक हातकणंगले ते रवाना झाले त्याठिकाणी पोलिसांनी विनोद करले नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्याकडे देखील गांजा मिळून आला.गुन्हा दाखलगांजा विरुद्ध केलेल्या कारवाई शहर पोलिसांनी रूहान नामक तरुणांसह विनोद कर्ले,असम जिदये यांच्याविरोधात एनडीपीएस कायदा कलम ८(क)२०(ब)π(ब),२९  अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय जाधव करीत आहेत.