खेड:- खेडमधील बँक ऑफ महाराष्ट्राकडे कर्जापोटी जमीन गहाण ठेवून सुमारे ३० लाख ८४ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. संबंधित जमीन विकून फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० जुलै २०१७ ते २ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये गुलमोहर पार्क खेड येथे घडला.
हनिफ हमजा मुल्ला (रा. निळीक, ता. खेड), जावेद युसुफ परकार (रा. गुलमोहर पार्क), कर्जी-आमशेतमधील आणखी एक अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
यातील संशयित यांनी मिळकत क्र. २७७/१/अ/९ मधील क्षेत्र ०४-६० चे या मिळकतीचे कागदपत्र बँक ऑफ महाराष्ट्रातून कर्ज काढून गहाण ठेवलेले असताना मिळकत निर्वेध असल्याचे भासवून त्यांना २९ लाख रुपयास विकून विश्वासघात केला व फिर्यादीची एकूण ३० लाख ८४ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली.