खेड:- येथील बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन एका प्रवाशाच्या बॅगेतून १ लाख रुपये किमतीच्या मंगळसूत्रासह रोख रकमेची चोरी झाली आहे. प्रवाशाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २२ मार्चला दुपारी घडली. येथील बसस्थानकातून खेड ते कुंभाड जाणाऱ्या एसटीमध्ये प्रवासी चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी प्रवाशाकडील मोठ्या पर्सची चेन खोलून छोटे पाकीट व त्यामधील आधारकार्ड व एटीएमसह सोन्याचे मंगळसूत्र व दोन हजारांची रोख रक्कम अशा एकूण एक लाख दोन हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी केली आहे. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.