रत्नागिरी:- गरोदर महिलेला डिलीव्हरीनंतर हृदयविकाराचा झटका आल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निहा इब्राहिम बुड्ये (३०, राजिवडा बांध, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास खासगी रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निहा ही गरोदर स्थितीत तिच्या तिसऱ्या आपत्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. डिलीव्हरी झाल्यानंतर तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तिच्यावर उपचार सुरु तिचा मृत्यू झाला.