गद्रे कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या नावासह फोटोचा गैरवापर; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरानजीकच्या ग्रदे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या नावाचा व फोटोचा गैरवापर अज्ञाताकडून केला जाऊ शकतो. या प्रकरणी संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्याने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना ३० ऑगस्ट २०२४ व गुरुवारी (ता. २) दुपारी पावणे बाराच्या सुमारास गद्रे मरीन कंपनीत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सचिन प्रभाकर हिरवे (४३, सुबोध नगर, जे. के. फाईल, रत्नागिरी) हे कंपनीत काम करत असताना ३० ऑगस्टला व गुरुवारी अज्ञाताने फोन केला. गद्रे मरीन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अर्जून दिपक गद्रे यांच्या नावाचा तसेच फोटोचा गैरवापर करुन बनावटीकरण करण्यात आलेले असून त्यांच्या लौकीकास बाधा आणून दोन्ही नंबर हे कोणत्यातरी प्रयोजनाकरीता वापरले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सचीन हिरवे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.