गद्रे कंपनीकडे चालत जाणाऱ्या मुलींना बसची धडक

रत्नागिरी:- गद्रे कंपनीकडे चालत जाणार्‍या तीन मुलींना मिरजोळे येथे एसटी बस चालकाने धडक दिल्याप्रकरणी एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकिल अब्दुल लतिफ बंदरकर (53, मिल्लतनगर बी 203, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे. या अपघातात ॠतुजा शिंदे (21, ओरी देणवाडी, सध्या रा. शिरगाव ) ही जखमी झाली. ही घटना 3 डिसेंबर रोजी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कु. धनश्री डावल, कु. मयुरी आणि ॠतुजा शिंदे या तिघी रस्त्याने चालत जात असताना स्वरुपानंद नगर येथील सरस्वती जनरल स्टोअर्स समोर मागून येणाऱ्या बसने ॠतुजा शिंदे हिला धडक दिली. या धडकेत ॠतुजा हिला दुखापत झाली. या अपघाताची माहिती पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी एसटी बस चालक अकिल अब्दुल लतिफ बंदरकर याच्यावर भादविकलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे.