गणपतीत चोरटे सक्रिय; कुवारबाव येथे दोन दुकाने फोडली

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव येथील फोटो स्टूडिओ आणि टायरचे दुकान फोडून अज्ञाताने दोन्ही दुकानातून सुमारे 31 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना सोमवार 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 ते मंगळवार 7 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 वा. कालावधीत घडली आहे.

याबाबत प्रदिप प्रभाकर हरचिरकर (39, रा.जागुष्टे कॉलनी कुवारबाव,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानूसार,अज्ञाताने हरचिरकर यांच्या दर्पण फोटो स्टुडिओचे लॉक तोडून व सिमेंट पत्रे उचकटून 5 हजार रुपयांचा कॅमेरा,1 हजार रुपयांचा फ्लॅश लाईट आणि त्यांच्या शेजारील दुर्गा टायर दुकानातून 17 हजार 810 रुपयांचे टिव्हिएस कंपनीचे 13 टायर,3 हजार 600 रुपयांचे एमआरएमचे 2 टायर आणि 4 हजार 400 रुपयांचे सीईटी कंपनीचे 2 टायर असा एकूण 31 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल लांबवला.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.