दापोली:- खेर्डी येथील रिलायन्स कंपनीच्या मेन कॅबिनेटमध्ये ठेवलेले राऊटर व मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री नऊ वाजण्यापूर्वी घडली. चोरीस गेलेल्या साहित्याची किंमत अंदाजे एक लाख वीस हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येते.
या प्रकरणी आदेश दिलीप किरगावकर (रा. दापोली) यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजून ३४ मिनिटांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.