खेड:-संगलट ते नांदगाव मार्गावर टेम्पोमधून गायीची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना कोरेगाव येथे पकडण्यात आले. ही घटना २४ मे रोजी दुपारी २ वा.च्या सुमारास घडली.
जावेद अहमद नाडकर (५४ , संगलट, खेड), साहिल दाऊद बडे (२३, नांदगाव, खेड), मुजम्मील अली नाडकर ( १९, संगलट खेड ) अशी संशयित तिघांची नावे आहेत. त्यांच्यावर भादविकलम ३४, महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५ (अ) (१) चे उल्लंघन कलम ९ मोटर वाहन अधिनियम १९८८ चे कलम १९२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद रविंद्र तुकाराम शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी दिली.