खेडशी-चाँदसूर्या येथे देशी-विदेशी दारुची बेकायदेशिरपणे विक्री प्रकरणी गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी-चाँदसूर्या येथे देशी-विदेशी दारुची बेकायदेशिरपणे विक्री करणार्‍या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 6 ऑगस्ट रोजी दुपारी 2.20 वा.सुमारास करण्यात आली असून एकूण 3 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

महेश रमेश चव्हाण (45,रा.कारवांचीवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार भैरवनाथ ब्रम्हदेव सवाईराम यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,खेडशी-चाँदसूर्या येथील एका माडी विक्री दुकानाच्या पाठीमागील बाजूस संशयित देशी-विदेश बनावटीच्या दारुची बेकायदेशिरपणे विक्री करत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, बुधवारी दुपारी ग्रामीण पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून एकूण 3 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.