खेडमध्ये शुल्लक वादातून वृध्देवर कोयतीने वार

खेड:-खेड तालुक्यातील खालची हुंबरी येथे शुल्लक कारणावरुन वृध्देच्या मनगटावर कोयतीने वार करुन जखमी केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद आनंदी गंगाराम निकम (75, खालची हुंबरी, मराठी शाळेजवळ खेड) यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदी निकम या घरामध्ये असताना संशयित आरोपी विजय मधुकर कदम (खालची हुंबरी, खेड) हा त्यांच्या पडवीत येवून निकम यांना व त्यांच्या मुलीला शिवीगाळ करत होता. यावेळी निकम म्हणाल्या, ‘तू माझ्या मुलीला का शिव्या देतोस, तुझी आई तिच्या मर्जीने माझ्या लेकीच्या घरी गेली आहे’ असे बोलल्याचा राग मनात धरुन विजय कदम याने निकम यांना शिवीगाळ व दमदाटी करत हातातील कोयतीने निकम यांच्या डाव्या मनगटावर वार केला. यात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले. 

याबाबतची तक्रार त्यांनी 23 एप्रिल रोजी खेड पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार विजय कदम याच्यावर 325, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात करुन अटक करण्यात आली.