खेडमध्ये देवीच्या मूर्तीची चोरी; गावातील तरुण ताब्यात

खेड:- खेड तालुक्यातील तळे येथील मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावातीलच एकास ताब्यात घेतल्याचे समजते.

या मंदिरात देवीच्या दगडांची मूर्ती बसवण्यात आली होती. या दोन मूर्त्या पुरातन काळातील होत्या. जुन्याजाणत्या ग्रामस्थांनी या मूर्तीची स्थापना केली असल्याचे सांगण्यात आले. या दोन मूर्ती येथील मंदिरातून दोन दिवसापूर्वी गायब झाल्या होत्या. प्रथम येथील ग्रामस्थांनी याविषयी गावात चौकशी केली होती. मात्र, यामध्ये त्यांना यश आले नाही. या बाबत ग्रामस्थांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही तासातच चोरट्यास ताब्यात घेतले. तपासासाठी श्वानपथकासही पाचारण करण्यात आल्याचे समजते.