खेडमध्ये गुरांच्या गोठ्याला आग लावून पळणाऱ्या संशयिताला घेतले ताब्यात

खेड:- खेड तालुक्यातील आष्टी बुदुक मोहल्ला येथे गुरांच्या गोठ्याला आग लावून पळून जाणाऱ्या संशयिताला पकडून घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. अशपाक महमंद रावल (आष्टी मोहल्ला, खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद इक्बाल बिजले (59, आष्टी बुद्रुक मोहल्ला) यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्बाल बिजले यांचा आष्टी बुद्रुक मोहल्ला येथे गुरांचा गोठा आहे. या गोठ्याला अश्यपाक रावल याने सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास आग लावून खाडी बाजूने पळून जात होता. त्याला पळताना पाहून इक्बाल बिजले यांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अशपाक याच्यावर भादविकलम 435 नुसार गुन्हा दाखल केला आहे.