खेडमधील दोन मंदिरांमध्ये चोरी

शिरगाव खुर्द, कुळवंडीतील प्रकार; तपास सुरू

खेड:- तालुक्यात चोरट्यांनी धार्मिक स्थळांनाही लक्ष्य केले आहे. शिरगाव खुर्द (शिवाजीनगर) येथील काळकाईदेवी मंदिर आणि कुळवंडीतील शिवशंकर मंदिर अशी दोन मंदिरे फोडून ३७ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून ‘नेला.

चोरट्यांनी शिरगाव खुर्द येथील काळकाईदेवी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. देवीच्या मंदिरातून पितळ धातूच्या ३ घंटा, दोन समया आणि सीसीटीव्ही डीव्हीआर असा मिळून २० हजाराचा ऐवज चोरून नेला. ही चोरी ३ आणि ४ ऑक्टोबर या कालावधीत झाली आहे. या घटनेची फिर्याद मंदिर व्यवस्थापक प्रभाकर भोसले यांनी पोलिस ठाण्यात दिली.

दरम्यान, ५ ऑक्टोबरला सकाळी कुळवंडी येथील शिवशंकर मंदिरातही चोरी झाल्याचे उघड झाले. चोरट्यांनी येथील १७ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये पितळ धातूच्या मोठ्या-लहान घंटा, समया तसेच तांब्याचे नाग, गळती पात्र, टोप आणि ताम्हण यांचा समावेश आहे. याची फिर्याद मनोहर जंगम यांनी दिली आहे.