संयुक्त कारवाई ; कडक लक्ष्मीचा खेळ करणाऱ्यावर हल्ला
खेड:-गेल्या महिन्यात कडक लक्ष्मीचा खेळ करणाऱ्याचा खुन केल्या प्रकरणातील संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. खेड पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष, बीडीडीएस आणि शहर पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई केली. या प्रकरणातील संशय़िताला न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दिनेश दत्ताराम चाळक (वय ४१ वर्षे, रा. सुकीवली, देवुळवाडी, ता. खेड ) असे संशयिताचे नाव आहे. त्याने सुरेश पेन्टप्पा कोळे (वय ३५ वर्षे, रा. धनगर गड़ा, इमनाचन, ता, गलनागा, जि. निदर, कर्नाटक) याचा खुन केल्याचा आरोप आहे. सुरेश कोळे, त्याची पत्नी व दोन लहान मुले रत्नागिरी जिल्हयामध्ये आली होती. कडक लक्ष्मीचा खेळ सायंकाळी सार्वजनिक ठिकाणी दाखविल्यावर, त्यातुन मिळालेल्या पैशातून त्यांचा उदर निर्वाह चालत होता. २० मे २०२२ ला सुरेश कोळे हे त्यांच्या कुटुंबासह भरणा नाका, खेड येथे सायंकाळी ५ वाजता आले. भरणेनाका पासुन जवळच असलेल्या घोले कांम्प्लेक्स या अपार्टमेंट समोरील मैदानात ते आले. सायंकाळनंतर मागुन आणलेले जेवण करून ते मैदानात झोपले. मध्यरात्री २ वाजता अनोळखी व्यक्ती जवळच बसलेल्या सुरेश कोळे यांना दिसल्याने ते ओरडले. ते ओरडल्याने त्यांची पत्नी सुध्दा जागी झाली. तो अनोळखी तेथून निघुन जाण्यासाठी पत्नीने बडबडायला सुरवात केली. त्यामुळे तो अनोळखी तेथुन निघुन गेला. परंतु थोडया वेळाने जाड लाकुड घेवुन आला.त्याने सुरेश कोळे यांच्या डोक्यात लाकूड मारून त्यांना जखमी केले. सुरेश कोळे यांच्या पत्नीशीही आरोपीने लगट करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने विरोध करून आरडा ओरडा केलेनंतर संशयित तेथून पळुन गेला. या घटनेबाबत खेड पोलिस ठाणे खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जखमी सुरेश कोळे औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचार सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी या प्रकरणी तपास पथके तयार केली. या पथकांनी तसेच खेड पोलिस ठाण्याच्या पथकाने गुन्हयाच्या ठिकाणी भेट देवुन माहिती घेतली आणि दिशा ठरवली. सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन संशयिताला ताब्यात घेतले. दिनेश चाळक याला खुनाच्या गुन्ह्यात आज अटक करून न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.