चिपळूण:- नदीत खेकडे पकडण्यासाठी जाऊ नको, असे बोलल्याने त्याचा राग धरून एका व्यक्तीने दुसऱ्याला मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. कादवड धनगरवाडीत १७ ऑक्टोबरला रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली.
याबाबत अलोरे – शिरगाव पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सुनील बबन ढवळे (वय. २९) याच्या भावाला गावातील अशोक बाबा शिंगाडे ही व्यक्ती रात्री नदीत खेकडे पकडण्यासाठी चल असे सांगत होती.. अशोक शिंगाडे याने मद्यपान केले होते. त्याच्या हातात बॅटरी आणि काठी होती. सुनील ढवळे याने त्याच्या भावाला अशोक शिंगाडे याच्याबरोबर खेकडे पकडण्यासाठी जाण्यास विरोध केला त्याचा राग धरून शिंगाडे याने ढवळे याला काठीने मारहाण केली. दगड फेकून मारले. त्यात ढवळे हा जखमी झाला आहे. याप्रकरणी अलोरे -शिरगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.









