खुनी हल्ल्यातून कोतवडेतील तरुणाची पुराव्याअभावी मुक्तता

रत्नागिरी:- सौदी येथे काम करताना सहकाऱ्याच्या सांगण्यावरून सौदीतील कंपनीने कामावरून काढल्याच्या रागातून चाकूने सपासप वार केल्याच्या ठपक्यातून कोतवडे येथील तरुणाची न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

सन्मित्र नगर येथील ओसवाल नगर येथे राहणारे तौसीफ मोहम्मद शरिफ गुहागरकर( वय ३०) हे कामानिमित्त सौदी येथे असताना त्यांच्या सोबत अकीफ पटेल (रा.कोतवडे) हा देखील त्यांच्या सोबत सौदी येथे कामाला होता. हे दोघेही एकाच रुममध्ये राहत होते. तौसीफ यांचा पेनड्राईन्ह ऑफिस मधील कामाच्या इतर वस्तु लपवुन ठेवणे असे प्रकारअकीफ हा करीत होता . याकारणावरून त्या दोघांच्यात वाद होत होते. या कारणावरून ते रुम सोडुन दुसरीकडे राहण्यास गेले होते तेव्हापासुन आकीफ हा तौसिफ याचेवर मनात राग धरुन होता. त्याने तौसिफ याला तुला बघुन घेईन अशी धमकी दिलेली होती. 

तौसीफ हे सौदीतून रत्नागिरीत सुट्टीवर आले होते. २० सप्टेंबर २०१९ रोजी तौसीफ हे नमाजपठण करण्यासाठी घराबाहेर पडले होते त्यावेळी आकीफ पटेल व त्यांचा साथीदार रस्त्यावर मोटरसायकल घेऊन उभे होते. तौसीफ यांची मोटरसायकल रस्त्यात अडवून आकीफ व त्याच्या साथीदाराने मारहाण करण्यास सुरुवात केली. तुझ्यामुळे मला सौदीतील कंपनीने कामावरून काढले तुला ठार मारतो अशी धमकी देवून आकीफ याने चाकूचे वार तौसीफ यांच्यावर केले. या हल्यात तौसीफ हे जखमी झाले होते.

या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात आकीफ पटेल व त्याचा साथीदार असरार निसार शेगले यांच्याचीरोधात भा.द.वि.क ३०७,३४१,३२३,५०४,५०६,३४,३७(१)(३)/१३५ नुसार गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.या खटल्याची अतिंम सुनावणी होऊन न्यायालयाने दोघांचीही सबळ पुराव्याभावी निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. संशयितांच्या वतीने एड.निनाद शिंदे यांनी न्यायालयात बाजू मांडली.