खिशात पैसे न सापडल्याने तरुणाला गंभीर जखमी करणाऱ्यास चिपळूणमधून अटक

चिपळूण:- नशा करण्यासाठी तरुणाच्या खिशात पैसे न मिळाल्याने खुनी हल्ला करणाऱ्याला युनिट चारने अटक केली आहे. ही घटना नववर्षाच्या पहिल्या दिवशी येरवडा परिसरात गुंजन चौकात घडली होती. तुषार ऊर्फ तुका तुकाराम कदम, (वय – 22 रा गांधीनगर झोपडपट्टी, नगर रोड, येरवडा) असे चिपळूणमधून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी तरुण १ जानेवारीला मित्रासोबत जात असताना काही मुले गोंधळ करीत होते. त्यामुळे फिर्यादी व त्यांचा मित्र तेथे थांबले. त्यावेळी गोंधळ करीत असलेल्या दोन जणांनी त्यांचेकडे पैसे मागुन एकाने खिसा तपासला. परंतु त्यांना पैसे न मिळाल्याने त्याचा राग मनात धरुन तरुणाला शिवीगाळ करीत पोटात चाकु खुपसुन गंभीर जखमी केले.

गुन्हयातील अनोळखी ओरापींताचे बाबत युनिट चार तपास करीत होते. पोलीस हवालदार हरीष मोरे व पोलीस नाईक नागेश कुँवर यांना आरोपीची माहिती मिळाली. आरोपी तुषार कदम हा त्याचे गावी चिपळूण, जि. रत्नागिरी येथे पळुन गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस अंमलदार हरीष मोरे, सारस साळवी, रमेश राठोड यांनी तात्काळ रत्नागिरी जाऊन शोध घेत ताब्यात घेतले.त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.ही कामगिरी रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार हरीष मोरे, नागेश कुँवर, सारस साळवी, प्रविण भालचिंम, रमेश राठोड यांनी केली आहे.