रत्नागिरी:- तालुक्यातील खालगाव-धामणेवाडी येथील इलेक्ट्रीक डीपी रस्त्यावर डंपर निष्काळजीपणे चालवून डीपी व लोखंडी पोलचे नुकसान केले. या प्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ फेंब्रुवारीला दुपारी पावणे एकच्या सुमारास धामणेवाडी येथील इलेक्ट्रीक डीपीचे ठिकाणी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार अज्ञात डंपर चालकाने डंपर निष्काळजीपणे चालवून खालगाव धामणेवाडी येथील इलेक्ट्रीक डीपी मोबाईल टॉवर येथील जाड्या केबलला धडक देवून इलेक्ट्रीक डीपी व लोखंडी पोलचे नुकसान केले. खबर न देता डंपर चालकाने पलायन केले. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी रविवारी (ता. ९) रात्री साडेनऊ वाजता गुन्हा दाखल केला.