Friday, July 24, 2026
spot_img
Home रत्नागिरी खरवते येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

खरवते येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- अचानक तब्बेत बिघडलेल्या प्रौढाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. मोहन शांताराम माटल (वय ४०, रा. खरवते वरचीवाडी, रत्नागिरी ) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २२) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहन माटल यांची मंगळवारी (ता. २१) रात्री साडेअकराच्या दरम्याने अचानक तब्बेत बिघडली. नातेवाईकांनी उपचारासाठी कोतवडे येथे आरोग्य केंद्रात दाखल केले अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.