Tuesday, May 5, 2026
spot_img
Home रत्नागिरी शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात कोकण अव्वल

शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात कोकण अव्वल

कोकण पोलिस महानिरीक्षक परीक्षेत्र राज्यात सर्वोत्तम

रत्नागिरी:- विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, हे १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदतर्फे करण्यात आलेल्या अंतिम मूल्यमापनात राज्यात सर्वोत्तम परिक्षेत्र ठरले आहे. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयी-सुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे कार्यालय म्हणून निवड करण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र कार्यालयाकडुन वापरण्यास सुलभ संकेतस्थळ तयार करण्यात आले होते. संकेतस्थळावर परिक्षेजातील अदयावत माहितीसह, सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे संपर्क क्रर्माक, माहिती अधिकार अन्वयेची माहिती, महत्वाच्या शासकीय विभागांची लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सुकर जीवनमानमध्ये कार्यालयात नागरीकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जाचे योग्य नियोजन करणेकामी संगणकीय अर्ज सनियंत्रण प्रणाली तयार केली. सीईआयआर पोर्टल अंतर्गत परिक्षेत्रातुन एकुण हरविलेल्या ६४४८ मोबाईल पैकी ३३०८ मोबाईलचा शोध लावुन त्यापैकी १०३८ मोबाईल प्रत्यक्षात हस्तगत करण्यात यश मिळवले. पोलीसांनी नागरीकांशी सौजन्यपूर्ण बागावे यासाठी पोलीसांना सॉफ्ट स्किल ट्रेनिंग देवून पोलीसांची नागरीकांमधील प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला.

वरीलप्रमाणे मुद्यांवर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र यांनी केलेल्या कार्यवाहीचे भारतीय गुणवत्ता परिषदतर्फे करण्यात आलेल्या अंतिम मूल्यमापनांत कोकण परिक्षेत्र हे राज्यात सर्वोत्तम परिक्षेत्र ठरले आहे.