खंडाळ्यात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; गुन्हा दाखल

रत्नागिरीः– तेरा वर्षीय अल्पवयीन बालिकेला फुस लावून पळवून नेणाऱ्या राजू नारायणलाल खारोल (रा.भिलवाडा राजस्थान) याच्या विरोधात जयगड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील वाटद खंडाळा येथे ही घटना घडली.

वाटद येथे राहणाऱ्या तक्रारदार यांच्या तेरा वर्षीय बालिकेला शेजारी राहणाऱ्या राजु यांने २२ नोव्हेंबर रोजी फुस लावून पळवून नेले. यावेळी त्यांच्या घरात कोणीहि नव्हते. याच संधीचा फायदा राजूने उठवला. बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार राजू खारोल याच्या विरोधात भादविक ३६३ नूसार गुन्ह दाखल केला आहे.