दापोली:- दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात जहूर अलिमिया कोंडविलकर (५३) यांच्या डोक्यात बियरची बाटली मारून दुखापत केल्याची घटना शनिवार ४ जानेवारी रोजी सायं. ७ च्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ४ जानेवारी रोजी सायंकाळी जहूर अलिमिया कोंडविलकर यांना त्यांच्या गावात राहणारे राजन कदम यांनी फोन करून तुम्ही गाडीवाल्याचे पैसे देणे बाकी आहात का? अशी विचारणा केली. जहूर अलिमिया कोंडविलकर हे स्वतः आपल्या मालकीची मोटारसायकल घेऊन पाजपंढरी येथे प्रकाश चौगुले यांच्या घरी विचारणा करण्यासाठी गेले. तेव्हा तेथे असलेला कैसर (पूर्ण नाव माहित नाही) रा. मुरूड याने कोंडविलकर हे विचारणा करीत असताना हुज्जत घालू लागला. त्यानंतर कोंडविलकर यांच्या अंगावर धावत येऊन हातात बियरची बाटली घेऊन त्याच्या डोक्यात मारली. यामध्ये कोंडविलकर यांना दुखापत झाली. जहूर कोंडविलकर यांनी कैसर याच्याविरोधात दापोली पोलीस ठाणेत फिर्याद दाखल केली आहे.