रत्नागिरी:- जिल्ह्यात आता सायबर गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. तुमच्या बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लाँडरिंंग व्यवहार झाल्याची भीती दाखवून क्रेडीट कार्डधारकांना तुमच्या कार्डवर हेल्थ इन्शुरन्स अॅक्टीव्ह झाला आहे, असे सांगून गुन्हेगार त्यांच्या मोबाईलमधील बँक अॅप्लिकेशनमध्ये सेटिंग बदलण्यास सांगतात व ग्राहकाने दिलेल्या परवानग्यांचा गैरवापर करून चोरटे मोबाईलचा संपूर्ण अॅक्सेसचा ताबा मिळवून कार्डवरून लाखोंची रक्कम उडवत आहेत.
मोबाईल बँक अॅप नसल्यास व्हॉटसअॅपवर फसवी यूपीके फाईल पाठवून फोन हॅक केला जात आहे. बँक खाते अद्यावत करायचे आहे, शेअर बाजारात गुंतवणूूक करा, घरात बसून ऑनलाईन काम करा, पैसे मिळवा, विविध फसवणुकीचे फंडे सायबरचे भामटे करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनो सावधान..हेल्थ इन्शुरन्स, बनावट कॉल, फसव्या अॅपपासून दूर राहा, सतर्क राहणे गरजेचे आहे.
सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार करीत आहेत. ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन पैसे पाठवणे यासह सर्व व्यवहार ऑनलाईन झाले आहे. याचाच फायदा घेवून सायबरचे भामटे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांची फसवणूक करीत आहेत. काहीच महिन्यापूर्वी लाईफ टाईम के्रडीट कार्डसाठी पुरवलेल्या माहितीतून एका ज्येष्ठाचे 6 लाखांची फसवणूक झाली आहे. आता के्रडीटकार्ड धारकांना हेल्थ इन्शुरन्स अॅक्टीव्ह झाला आहे असे सांगून येपीके फाईल पाठवून मोबाईल हॅक करून फसवणूक करीत आहेत.तसेच तुमच्या खात्यात 2 कोटींचा मनी लाँडरिंंग व्यवहार झाला असे सांगून तब्बल 62 लाखांची फसवणूक एका ज्येष्ठ नागरिकाची झाली आहे. डिजिटल अॅरेस्ट,बनावट कॉल, शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करा, घरात बसून ऑनलाईन काम करा, पैसे मिळवा यासह बँकेतून बोलतोय खाते अद्यावत करायचे आहे नाहीतर खाते बंद होईल असे सांगून लूट सुरू आहे. यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.