रत्नागिरी:- कोरोना काळात जेलमधून बाहेर पडलेला कुख्यात गुंड सचिन जुमनाळकर अद्यापही फरारच आहे. जेलमधून बाहेर पडलेला गुंड जुमनाळकरचा पोलीस कसून शोध घेत आहेत. सचिन जुमनाळकर याच्यावर मनोहर ढेकणे यांच्यावर गोळी झाडल्याचा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे.
रत्नागिरी शहरातील नॅशनल मोबाईल शॉपी मालक मनोहर सखाराम ढेकणे (60, फडके उद्यान, रत्नागिरी) यांच्यावर गुंड सचिन जुमनाळकर याने बंदुकीतून गोळी झाडून जखमी केल्याची घटना 21 फेबुवारी 2020 रोजी घडली होती.
मनोहर ढेकणे हे आठवडा बाजार येथील आपल्या मोबाईल शॉपीमधील काम आटपून दुचाकीने घरी जात होत़े. रात्री 9.30 च्या सुमारास सचिन जुमनाळकर याने व त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराच्या मदतीने ढेकणे यांचा रस्ता अडवला. यावेळी सचिन जुमनाळकर याने ढेकणे यांच्याकडे 50 हजार रूपयांच्या खंडणीची मागणी केल़ी. मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत पैसे देणार नाही, असे ढेकणे यांनी जुमनाळकर याला सांगितल़े यावरून वाद निर्माण झाल्याने जुमनाळकर याने चाकूचा धाक दाखवून ढेकणे यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केल़ा मात्र ढेकणे हे बॅग सोडत नसल्याचे लक्षात येताच जुमनाळकर याने आपल्या खिशातील पिस्तुल काढून ढेकणे यांच्यावर गोळी झाडली. या प्रकरणी शहर पोलिसांत सचिन भिमराव जुमनाळकर (42, ऱा बेलबाग रत्नागिरी), मनोहर हनुमंत चालवादी (42, ऱा रत्नागिरी) व सिद्धराव नामदेव कांबळे (28, ऱा बेलबाग, रत्नागिरी) या तिघांविरूद्ध भादंवि कलम 307, 386, 397,75 सह 34 व भारतीय हत्यार कायदा कलम 3/25,27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा होता. तसेच पोलिसांकडून न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल करण्यात आल़े. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल़ ड़ी बीले यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येत आह़े. सरकारी पक्षाकडून ऍड़ प्रफुल्ल साळवी खटला चालवत आहेत.
मात्र गोळीबार केल्याचा आरोप असलेला सचिन जुमनाळकर हा मागील काही महिन्यांपासून फरार झाला आह़े. कोरोना काळात जुमनाळकर याला काही कालावधीसाठी कारागृहातून बाहेर सोडण्यात आले होत़े. मात्र अद्याप तो जेलमध्ये परतला नसल्याचे समोर येत आह़े. दरम्यान रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे खटला चालू असताना सचिन फरार झाल्याने खटला चालवताना अडचणी निर्माण होत आहेत.
यापूर्वी खुनाच्या आरोपात झाली होती जन्मठेप
जुमनाळकर हा रत्नागिरीमधील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जात़ो. धनजीनाका येथील फैय्याज हकीम खूनाच्या आरोपाखाली त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होत़ी. मात्र जेल प्रशासनाकडून जुमनाळकर याला पॅरोलची रजा मंजूर केली होत़ी. याच काळात पैशाच्या हव्यासापोटी त्याने रत्नागिरीमधील प्रसिद्ध व्यावसायिक मनोहर ढेकणे यांच्यावर गोळीबार केला, असा आरोप ठेवण्यात आला आह़े.