कोरे मार्गावरील संपर्क क्रांती एक्स्प्रेस मधून साडेपाच लाखांचा मुद्देमाल चोरीला

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या कोचिवली चंदिगड संपर्क क्रांती एक्स्प्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने ५ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी सव्वासहाच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाईन कुन्नेल दिवाकरण (वय ४९, रा. सुर्य रेसिडेन्सी न्यु पाल रोड अदाजान सुरत गुजरात) हे चंदीगड संपर्कक्रांती एक्स्प्रेस मधून प्रवास करत असताना त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्या ४ लाख ७७ हजार
९०० रुपयांचे सोन्याचे दागिने, त्यामध्ये बांगड्या, ब्रेसलेट, चेन, लॉकेट, विंटी, सोन्याचा सिक्का आदी. ३३ हजारचे डायमंड इअररिंग, २ हजार ६०० रुपयांचे चांदिचे दागिने, ३० हजार किमतीची पाच घड्याळे, ४ हजार ५०० रुपयांची रोख व कागदपत्र असा
सुमारे ५ लाख ४८ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने पळविला. या प्रकरणी दिवाकरण यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.