रत्नागिरी:- कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना विना अट नोकरीत सामावून घेणे यासह अनेक मागण्या कोकण रेल्वे प्रशासनापुढे ठेवण्यात आल्या आहेत. त्याबाबत कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांसह कोकणातील सर्व मंत्री, खासदार, आमदार यांना प्रत्यक्ष भेटून व पत्राद्वारे लेखी निवेदन देण्यात आले. मात्र त्याची एकानेही गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर प्रकल्पग्रस्त उमेदवारांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असे प्रकल्पग्रस्त कृती समिती अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सांगितले.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या खेड येथील बैठकीत ते बोलत होते. यावेळी खेड, चिपळूण, रत्नागिरी, महाड, माणगाव येथील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी मुले रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या आडमुठे धोरणामुळे आंदोलनाच्या उंबरठ्यावर आले आहेत. कोकण रेल्वे प्रशासन हे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या गांभीर्याने घेत नाही. गेली 2010 पासून समिती सतत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचीना विना अटी नोकरीत सामावून घेणे. संबंधित अशा अनेक प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या कोकण रेल्वे प्रशासन हे गांभीर्याने घेत नसल्याचे पकल्पग्रस्त संघर्ष समितीकडून सांगण्यात आले. कोकण भुमी प्रकल्पग्रस्त समितीतर्फे ठेवलेल्या सभेत प्रामुख्याने कोकण रेल्वे प्रशासनाचा अंधाधुंद कारभार कसा चालू आहे, या संबंधित प्रकल्पग्रस्तांबरोबर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने कोकण रेल्वे प्रशासन हे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या गांभीर्याने घेत नाही. कोकण रेल्वेसाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या न्याय माणसाच्या पूर्ततेसाठी कोकण रेल्वे प्रशासन व संबंधित प्रशासकीय अधिकारी वर्ग व रेल्वे मंत्रालय यांच्याकडे 2010 पासून वारंवार पाठपुरावा करीत आहे. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या प्रश्नांवर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी जनता दरबार घ्यावा अशी मागणी मागणी केली होती. त्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी, खासदार, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक व संबंधित नोकर भरती अधिकारी व कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त आणि कृती समिती पदाधिकारी यांचा समावेश असणे गरजेचे आहे. या निवेदनाला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. याविरोधात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग सर्व प्रकल्पग्रस्त एकाच वेळी आंदोलन पुकारु आणि तडीला नेण्याचा इशारा देण्यात आला आहे. या सभेला कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष विनायक मुकादम, अमोल सावंत (सचिव), शैलेश शिवगण (खेड, ता.अध्यक्ष), तेजस खेडेकर (खेड, प्रतिनिधी), सुचक राजेशिर्के (माणगाव, ता.अध्यक्ष), प्रकाश मासुक (माणगाव, प्रतिनिधी), गणेश राजमाने (महाड, ता. अध्यक्ष), सुमित साळवी (महाड, प्रतिनिधी), सुनील देवळेकर (चिपळूण), शैलेश जाधव (सावर्डे) यांची प्रमुख उपस्थिती होती.