चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कोकरे गावात बोअरिंग मारताना लागला गरम पाण्याचा झरा लागला आहे.संजय दळवी यांच्या जागेत हे गरम पाण्याचे अखंडित वाहणारे पाणी पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल मारताना 150 फुटांवर गरम पाणी लागले आहे. कोकरे वगळता संगमेश्वर तालुक्यात आरवली, राजवाडी येथे गरम पाण्याची कुंडे आहेत. 150 फुटांहून खोल असलेले पाणी वेगाने वाहत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहेया बोअरिंगच्या बाजूला कुंड करून सर्वांना खुलं करणार असल्याची मालक संजय दळवी यांनी सांगितले.