कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीतच

खेड:- मध्य रेल्वेच्या पनवेल हद्दीत मालगाडीला झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली असली तरी रेल्वेगाड्या विलंबाने धावत आहेत.मंगळवारीही बिघडलेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसला.

ओखा एक्सप्रेस १५ तास तर कोच्युवेली एक्सप्रेस तब्बल १० तास तर पनवेल- मडगाव अनारक्षित स्पेशल ६ तास उशिराने मार्गस्थ झाल. अन्य ८ रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाल. सलग चौथ्या दिवशीही बिघडलेल्या वेळापत्रकाने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला . ०२१९ ७ क्र.ची कोईमतूर - जबलपूर स्पेशल १ तास तर ११००३ क्र . ची दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस २ तास विलंबाने रवाना झाली . १२२०१ क्र.ची एलटीटी - कोच्युवेली गरीबरथ ३ तास उशिरानेच धावली . १६३४६ क्र.ची तिरुवअनंतपूरम - एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस १ तास , १९५७७ क्र.ची जामनगर एक्सप्रेस १ तास ३० मिनिटे , २०१११ क्र.ची सीएसएमटी- मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसही ३ तास उशिरानेच धावली . ०११६८ क्र.ची कुडाळ एलटीटी स्पेशल १ तास २० मिनिटे , १०१०६ क्र . ची सावंतवाडी - दिवा पॅसेंजर १ तास ५० मिनिटे , १२६१८ क्र.ची निजामुद्दीन- एर्नाकुलम एक्सप्रेस १ तास १५ मिनिटे , २२१४ ९ क्र.ची एर्नाकुलम पुणे एक्सप्रेस २ तास २० मिनिटे विलंबाने रवाना झाल्या . कोकण मार्गावरून धावणारी १०१०३ क्र . ची सीएसएमटी मुंबई - मडगाव मांडवी एक्सप्रेसच्या प्रवाशांची मंगळवारीही तब्बल ८ तास रखडपट्टी झाली.