कोकण नगर येथे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या बांधकामांवर बुलडोझर

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिम कोकण नगर भागातून हाती घेतली आहे. येथे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारी बुलडोझर फिरवण्यात आला. नगराध्यक्ष पदाचा कारभार हाती घेताच शिल्पा सुर्वे यांनी ही धडक कारवाई सुरू केली आहे.

विमानतळाकडे जाणारा रस्ता 30 मीटरचा मंजूर असून या रस्त्यावर अनेक अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. या बांधकामांवर शुक्रवारी हातोडा मारण्यात आला. संपूर्ण रत्नागिरी शहरातील अनधिकृत बांधकामे लवकरच जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे नगराध्यकास शिल्पा सुर्वे यांनी सांगितले.