कोकणनगर येथे एकाला धारदार वस्तूने मारहाण

रत्नागिरी:- लोकवस्ती असलेल्या ठिकाणी रस्त्यावर लघुशंका करत असल्याच्या रागातून एकाला शिवीगाळ करत पत्र्यासारख्या धारदार वस्तूने मारुन दुखापत करण्यात आली. ही घटना मंगळवार 20 मे रोजी रात्री 10 वा. सुमारास कोकणनगर परिसरात घडली. याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फरहान मुल्ला (रा.कोकणनगर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रथमेश चंद्रकांत सागवेकर (22, रा.गणेश कॉलनी नाचणे, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी रात्री प्रथमेश सागवेकर त्याच्या मित्राला कोकणनगर येथून त्याच्या घरी घेउन जात होता. त्यावेळी लघुशंकेसाठी त्याची गाडी रस्त्यावर थांबूवन बाजुच्या अंधारात गेला होता. तेव्हा तिथल्या चिकन सेंटरमध्ये बसलेले काही जण तिथून ओरडत होते. तेव्हा प्रथमेशने त्यांना त्याबाबत विचारणा केल्यावर संशयित आरोपीत फरहान मुल्लाने तुला काय कळत कि नाही,येथे लोकवस्ती आहे. येथून महिलांची ये-जा असते. तुला अक्कल वगैरे आहे का असे विचारले. त्यावर प्रथमेशने आता काळोख आहे. रस्त्यावर कोणीही नाही, आता तुला कोणी महिला दिसत आहेत का असे विचारले. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली व संशयिताने प्रथमेशच्या कानाखाली मारुन तू पुढे लाईटच्या इथे ये तुला बघतो असे सांगितले. त्यानंतर प्रथमेशला शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर तसेच बाजुच्या चिकन सेंटरमधून पत्र्यासारखी टोकदार वस्तू घेउन प्रथमेशच्या अंगावर धावून गेला. ती धारदार वस्तू तीन वेळा त्याच्या पोटावर मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस प्रथमेशचा मित्र मधे पडल्यावर आरोपीने ती टोकदार वस्तू प्रथमेशच्या डाव्या खांद्यावर, मानेवर मारुन दुखापत केली. दरम्यान, बुधवार 21 मे रोजी प्रथमेशला या मारहाणीचा त्रास होउ लागल्याने त्याने जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार करुन घेतले आहेत.