कोकणनगर येथील मटका जुगारावर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:- शहरातील कोकणनगर येथील चायनिज सेन्टरच्या मागे उघड्या जागेत विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी साहित्यासह १ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असिफ फक्रुद्दीन काद्री (६०, रा. कोकणनगर अन्सार चौक, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.३) दुपारी दीडच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोकणनगर येथे विनापरवाना मटका जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत संशयिताकडे साहित्यासह १ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल सापडला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.