कोंडगाव येथील तरुणावर तलवारीने हल्ला प्रकरणी तिघांना अटक

साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे भडकंब्यातील सागर चैद्य या तरुणावर झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण रत्नागिरी विभागाने तिघांना अटक केली आहे.

सुशांत संजय सुर्वे (वय २५ राहणार साखरपा), प्रसाद प्रभाकर पालांडे (वय २३ रा. लोकमान्यनागर ठाणे) व कृनाल अंकुश चव्हाण (वय २९ रा. रबाडा ठाणे) यांना अटक करून देवरुख पोलिसांच्या ताब्यात दिले व देवरुख पोलिसांनी न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, दोन दिवस साखरपा परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते व भ्याड हल्ल्याचा निषेध देखील जनतेने व्यक्त केला होता. या प्रकरणी देवरुखचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार अधिक तपास करीत आहेत.