कॉलेज युवतीची छेड काढणाऱ्या ‘त्या’ रिक्षा चालकाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- रिक्षातील प्रवासी युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाने आत्महत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास हि घटना उघडकीस आली. अविनाश म्हात्रे हा रिक्षा चालक राहात असलेल्या साईदीप ग्रुह संकुल, शांतीनगर, नाचणे या इमारतीच्या टेरेसवर रिक्षा चालकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढल्यावर पोलिसाना कळविण्यात आले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे. दोनच दिवसांपूर्वी या रिक्षा चालकाची जमिनावर मुक्तात झाली होती.

रिक्षातून जाणाऱ्या युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी अविनाश म्हात्रे या रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली होती. सोशल मीडियावर आपल्या सोबत घडल्या प्रकाराची पोस्ट संबंधित युवतीने पोस्ट टाकल्यावर रत्नागिरीत प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता.