केळशीत मासेमारी नौकेला जलसमाधी; बेपत्ता दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला

दापोली:- दापोली तालुक्यातील केळशी येथे मासेमारी नौका बुडाली. या नौकेत आठ खलाशी होते.त्यापैकी चार जणांना वाचविण्यात यश आले. दोघे खलाशी बेपत्ता झाले होते त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. दुसऱ्याचा शोध सुरु आहे. 

माशाअल्ला नावाची ही बोट क्रमांक IND MH04MM3171 ( 08 जणासह) व इतर 8 बोटी शनिवारी सायंकाळी (15 ऑगस्ट) रोजी अंदाजे साडेचार चे दरम्यान भारजा नदीच्या खाडीतून समुद्रात जात असताना मोठी लाट आली. बचावासाठी वळण घेत असताना बोटीवर लाट आपटून बोट पलटी झाली. यामधील मकबूल शेखअली चाऊस, बोट मालक सलाम युसूफ चाऊस, इम्रान अब्बास अल्बा, इब्राहिम आदम खमसे हे चारजण बोटीबाहेर फेकले गेले व त्यांना सोबत असणाऱ्या बोटीवरील लोकांनी ताबडतोब मदत करून वाचविण्यात यश मिळविले.

इतर दोन शादत इब्राहिम बोरकर व गणी इस्माईल खमसे हे बोटीखाली सापडल्याची दाट शक्यता होती. त्यातील शादत इब्राहिम बोरकर यांचा मृतदेह रविवारी सकाळी बोटीच्याच जाळ्यात सापडला तर बेपत्ता दुसऱ्या खलाशाच्या शोध सुरू आहे.