रत्नागिरी:- रेल्वेच्या केरला संपर्क क्रांती एक्स्प्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा ४० हजाराचा आय फोन चोरट्याने पळविला. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. १६) दुपारी दीडच्या सुमारास केरला संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शौकत अब्दुल्ला अली (३२) हे निजामुद्दीन दिल्ली येथून कोझिकोड येथे जाण्यासाठी केरला संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. रत्नागिरी रेल्वेस्टेशन आल्यावर त्यांनी ४० हजाराचा मोबाईल आय फोन ट्रेनमध्ये चार्जिंगला लावला. ट्रेन सुरु झाल्यावर एका अज्ञात चोरट्याने तो काढून चालत्या ट्रेनमधून उडी मारुन धावत निघून गेला. या प्रकरणी शौकत अली यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.