पावस:- तालुक्यातील कुर्धे-गणेशगुळे फाटा येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या प्रौढा विरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. रमिझ युसुफ गावखडकर (वय ४०, रा. गावखडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १३) रात्री सव्वा आठच्या सुमारास कुर्धे-गणेशगुळे फाटा येथील कातळावर निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमिज गावखडकर हे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस नाईख प्रशांत लोहळकर यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









