रत्नागिरी:- फेडेक्स इंटरनॅशनल कुरीअरच्या एका कुरीअर इक्झिक्युटीव्ह नावाचा वापर करुन प्रा.डॉ.सुधीर गंगाधरराव अकोजवार यांची २ लाख ५१ हजार ९९९ रु.ची फसवणूक करणार्या अज्ञातावर शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास प्रा.डॉ.सुधीर अकोजवार यांच्या मोबाईलवर फेडेक्स इंटरनॅशनल कुरीअरच्या एका कुरीअर इक्झिक्युटीव्ह नावाचा वापर करुन त्याआधार डॉ.अकोजवार यांच्या बँक खात्यातील सुमारे २ लाख ५१ हजार ९९९ रु.ची फसवणूक केली. डॉ.अकोजवार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलीसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६ (ड) भादंविक ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.