Saturday, June 13, 2026
spot_img
Home संगमेश्वर कुरधुंडा येथे दुचाकी घसरून तरुणी गंभीर जखमी

कुरधुंडा येथे दुचाकी घसरून तरुणी गंभीर जखमी

संगमेश्वर:- तालुक्यातील कुरधुंडा येथे दुचाकी घसरून झालेल्या एका भीषण अपघातात एक तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय विजय कानसे (३०, रा. उजगाव, ता. संगमेश्वर) हा तरुण मानसी विलास घडवळे (२५, रा. लांजा-दापोली) हिच्यासह दुचाकीवरून (क्रमांक एमएच०८/क्यू/६४०४) प्रवास करत होता. ९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास कुरधुंडा येथे जात असताना अचानक दुचाकी

घसरली. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेली मानसी ही रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर मार लागला. अक्षय हा तरुणीला घेऊन ८ एप्रिल रोजी गणपतीपुळे येथे दर्शनासाठी गेला होता त्यानंतर तो ९ एप्रिल रोजी सकाळच्या दरम्यान संगमेश्वर येथील देवदर्शन करण्यासाठी निघाला होता. मात्र त्या दरम्यान अपघात घडला.

अपघातानंतर मानसी हिला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती अक्षय कानसे याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.