किर्तीनगर येथून १ लाखाची दुचाकी पळविली; चोरट्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- मजगाव येथे घराच्या गल्लीत पार्क केलेली एक लाख रुपयांची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ जानेवारीला दुपारी साडेतीन ते रात्री साडेनऊच्या सुमारास किर्तीनगर, मजगाव येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मतीन हसनमियॉ डोंगरकर यांचा मित्र दिपक मनोहर कांबळे (रा. एन. एम. जोशी रोड, चिचपोकळी, मुंबई) याने त्याची दुचाकी (क्र. एमएच-०१ सीबी ६३६३) किर्तीनगर येथील डोंगरकर यांच्या घरासमोर गल्लीत पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी डोंगरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.