रत्नागिरी:- शहरातील किर्तीनगर येथील भाड्याच्या घरातून संशयिताने रोख 7 लाख 50 हजार रुपये असलेली बॅग लांबवली. ही घटना रविवार 1 जून रोजी सकाळी 5 ते 10.30 वा. कालावधीत घडली आहे.
प्रदिपसिंह मलखमसिंग यादव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात मोहम्मद आलम समसाद खान (27) यांनी सोमवार 9 जून रोजी दुपारी 3.16 वा. सुमारास शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, यातील संशयित आणि फिर्यादी हे दोघेही आसिफ मोटलानी यांच्या घरात भाड्याने रहात होते. 1 जून रोजी संशयिताने फिर्यादीची रोख 7 लाख 50 हजार रुपये असलेली बॅग चोरुन नेली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.