किरकोळ कारणातून दोघांमध्ये वाद होऊन हाणामारी

चिपळूण:- तालुक्यातील कळवंडे- कातळवाडी येथे मंगळवारी सकाळी ९:३० वाजता किरकोळ कारणावरून दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यातून एकमेकांना मारहाण झाल्याने एकजण जखमी झाला. संतोष भागूराम पेवेकर (वय ५५, रा. रोहिदास वाडी, कळवंडे) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या मारहाणप्रकरणी दत्ताराम शिवराम वरपे (वरचीवाडी, कळंवडे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

दत्ताराम यांचा सदा वरपे यांच्याशी वाद झाला होता. संतोषने आपल्यात आणि सदा गमरे यांच्यात लावालावी केली असा गैरसमज करून घेत दत्ताराम वरपे याने संतोष यांना शिवीगाळ केली. त्यावेळी संतोष पेवेकर हे कळवडे येथील टिळे या ठिकाणी बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. शिवीगाळीमुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचा राग येऊन दत्तारामने संतोष यांच्या डोक्यात आणि पाठीत काठीने मारहाण केली. यामध्ये संतोष यांना दुखापत झाली. वरपे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करत आहेत.