किरकोळ कारणातून तरुणाला काठीने मारहाण

चिपळूण:- तालुक्यातील बामणोली गवळवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या घराबाहेर कुत्र्यांना खायला घालत असलेल्या एका ४३ वर्षीय तरुणाला “तू माझे नाव का घेतले?” असा जाब विचारत शेजाऱ्याने काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रविण केशव पाचकडे (वय ४३, रा. बामणोली गवळवाडी) हे ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०:१५ वाजण्याच्या सुमारास आपल्या घराबाहेर कुत्र्यांना खायला घालत होते. यावेळी रस्त्याच्या पलीकडे उभा असलेला आरोपी रवि तांबे (रा. बामणोली तांबेवाडी) याने प्रविण यांना उद्देशून, “तू माझे नाव कसे घेतलेस?” असा वाद उकरून काढला.

​वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी रवि तांबे याने प्रविण पाचकडे यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरडाओरडा ऐकून प्रविण यांचे नातेवाईक मनोज पाचकडे, प्राजक्ता पाचकडे, रेणुका पाचकडे आणि कांचन कोटकर हे भांडण सोडवण्यासाठी आले. मात्र, संतप्त आरोपीने त्यांनाही धक्काबुक्की करत गोंधळ घातला.

​या मारहाणीत प्रविण पाचकडे हे जखमी झाले असून त्यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी रवि तांबे याच्या विरोधात खालीलप्रमाणे कारवाई केली आहे: