रत्नागिरी:- तब्बल 60 दिवसांच्या बंदी नंतर मासेमारीचा नवा हंगाम शनिवार 1 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. राज्य शासनाने किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी दिली आहे. मात्र किनारपट्टी भागात सुरू झालेल्या वादळी पावसाने मासेमारीचा नवा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता अधिक आहे. हवामान विभागाने देखील 3 ऑगस्ट पर्यंत पावसाचा यलो अलर्ट दिल्याने पुढील तीन ते चार दिवस नवा मासेमारी हंगाम सुरू होण्याची शक्यता धूसर आहे.
पावसाळा हा बहुतांश सागरी माशांच्या प्रजननाचा हंगाम असल्याने मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि पुनरुत्पादन व्हावे, यासाठी दरवर्षी या कालावधीत मासेमारीवर बंदी घालण्यात येते. यामुळे माशांची संख्या वाढण्यास मदत होते आणि भविष्यात मत्स्यसंपत्तीचे संरक्षण सुनिश्चित होते. यावर्षी मासेमारी बंदीचा कालावधी 61 दिवसांचा निश्चित करण्यात आला होता. मात्र, यंदा महाराष्ट्र शासनाने यांत्रिक व









