रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील ढाब्या जवळील रस्त्यावर दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात दोघे तरुण जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शंकर यनगप्पा हंनबर (वय २२) व सतीश कनकवडी (२६, रा. खेडशी, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. २) दुपारी दोनच्या सुमारास कारवांचीवाडी येथील ढाब्याजवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वार हे दुचाकी घेऊन कारवांचीवाडी कडे जात असताना अचानक दुचाकीवरील स्वाराचा ताबा सुटला व दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.