रत्नागिरी:- कामाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेला तरुण घरी न परतल्याने शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना शनिवार 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वा.कोकणनगर येथे घडली आहे.
रमिज जब्बार शेख (26, रा. कोकणनगर हिना चौक, रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी मी जयगड येथील कंपनी मध्ये बदली ड्रायव्हर म्हणून कामाला जात असल्याचे घरी सांगून तो बाहेर पडला होता. मात्र,सोमवार 20 फेब्रुवारी रोजीपर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. रमिजची उंची 5 फूट 5 इंच,चेहरा गोल, अंगात फूल शर्ट,नेसणीस निळ्या रंगाची फुल जिन्स पॅन्ट, हातात घड्याळ, पायात चप्पल असा पेहराव आहे. रमिज बाबत कोणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाणे – 0252-222333 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.