वळके-पाली येथील दोघांकडून कापडगावच्या तरुणाची फसवणूक
रत्नागिरी ः कोकण कामधेनू प्रकल्प सुरु करुन त्याद्वारे वेगवेगळ्या उत्पादनाची निर्मिती करणार असल्याचे खोटे सांगून एनईएफटी द्वारे ६० हजार व घरातून ४० हजार रोख रुपये घेऊन एकूण १ लाखाची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश प्रकाश सावंत आणि एक महिला (दोघे रा. वळके-पाली, ता. रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना १२ मार्च २०२१ ते २२ मार्च २०२५ या कालावधीत तालुक्यातील कापडगाव-बौद्धवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अतुल जयराम कांबळे (वय ४२,रा. कापडगाव-बौद्धवाडी, रत्नागिरी) यांना संशयितांनी प्रतिभा इंटरप्रायझेस अंतर्गत कोकण कामधेनू प्रकल्प सुरु करत असून त्याद्वारे वेगवेगळ्या उत्पादनाची निर्मित करणार असल्याचे खोटे सांगून फिर्यादी अतुल कांबळे यांच्याकडून एनईएफटीद्वारे ६० हजार ट्रान्स्फर करुन घेतले तसेच फिर्यादी यांचेकडून घरी कापडगाव येथून ४० हजार रुपये रोख घेऊन १ लाखाची फसवणूक केली. या प्रकरणी अतुल कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्ररीवरुन पोलिसांनी दो