कामगारांनी लावला ठेकेदाराला चुना;  लाखाचा माल केला लंपास

रत्नागिरी:- परप्रांतीय ठेकेदाराकडे कामाला असलेल्या कामगारांनी ठेकेदाराला चुना लावत तब्बल १ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शहरातील नूतन नगर येथे घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र  कुमार सवल प्रसाद यादव (वय- 38 वर्षे , व्यवसाय – पी.ओ.पी. काम सध्या रा . अभ्युदयनगर नुतननगर नाचणे रोड सुहास मनोहर शिंदे यांच्या घरी)हे तीन वर्ष याठिकाणी राह्त आहेत. ते पी.ओ.पी. चे रत्नागिरी शहरात काम करत असल्याने त्यांनी आपल्या मदतीसाठी दुर्गा प्रसाद छोथु यादवम,रामशंकर यांना आणले होते. लॉकडवुनच्या काळात  जितेंद्र यांनी शहरात  काही ठीकाणी पीओपीचे काम केले होतेत्या कामाचे पैसे त्यांना मिळाले होते. कामगारांचा पगार करण्यासठी त्यांनी ९१ हजार रुपयांची रक्कम घरी आणून ठेवली होती.

जितेंद्र यांच्या तक्रारीनुसार  १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सकाळी ८  वा . चे दरम्याने ते  अभ्युदयनगर स्टॉप येथे चहा पीण्याकरीता गेले होते. . चहा पिवुन झाल्यानंतर ९ च्या सुमारास ते घरी आले. तेव्हा घर मालक सुहास मनोहर शिंदे यांच्या आई मालती शिंदे यांनी जितेंद्र यांना कामगार  दुर्गा प्रसाद छोठू  यादव व रामशंकर राजभर हे कुठे गेले असे विचारले असता ते चहा पिण्याकरिता गेले असावेत असे त्याने सांगितले.

त्यानंतर जितेंद्र यांनी कामगारांच्या मोबाईलवर फोन केला असता त्यांनी लतीफ बागवान यांचे घरी साईटवर काम करीत आहोत असे सांगितले . सायंकाळी पुन्हा त्यांना फोन केला असता दुर्गा प्रसाद आम्ही आंबा घाटात आहोत. मिरजला जात आहोत असे सांगितले. आपले कामगार आपल्याशी खोटे बोलतायत हे लक्षात आल्याने जितेंद्र यांनी खोलीत जाऊन बॅगमध्ये पिशवीत बाधुन ठेवलेली ९१ हजार रुपयांची रक्कम आहे पाहिली.मात्र ती रक्कम दिसून आली नाही.दुर्गा प्रसाद छोथु यादव व रामशंकर राजभर यांनी २ ड्रीलमशीन कंपनीची व ९१ हजार रुपयांची रोकड  इतर साहित्य असा मिळून १ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी जितेंद्र यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.