चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कापसाळ येथील बंद घर फोडून सुमारे ४२ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी करणाऱ्या संशयित आरोपी लोकेश रावसाहेब लोकरे यास पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी शंकर गणपतराव झोरे वय ५२ (रा. कापसाळ) यांचे बंद घर दि. १ एप्रिल २०२२ रोजी ०६.४५ वा. चे मुदतीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे दर्शनी दरवाज्याला लावलेली कडी व कोयंडा तोडुन आत प्रवेश करून लोखंडी कपाटामधील लॉकरमध्ये ठेवलेली ४१ हजार ७०० रुपये किंमतीची एक तुटलेली सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी लंपास केली होती. या प्रकरणी अज्ञाताविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणेत आलेला होता.
सदर गुन्हयातील आरोपीत याचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेता सदर गुन्ह्यातील आरोपीत लोकेश रावसाहेब लोकरे (वय २८, रा. खटाव रस्ता, पाटील मळा, लिंगनुर, ता. मिरज) यास अटक करुन चोरीस गेलेली ४१ हजार ७०० रुपये किंमतीची एक तुटलेली सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी हस्तगत करण्यात आलेली आहे.









